9 May 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Sarkari Bank Shares | आर्थिक शहाणे व्हा रे! या सरकारी बँका FD वर 5-6% व्याज देतात, अन शेअर्स घेणाऱ्यांना 118 ते 127 टक्के नफा

Sarkari Bank Shares

Sarkari Bank Shares | PSU बँकांचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून कमालीचे प्रदर्शन करत आहेत. PSU बँकांच्या शेअर्समध्ये मजबूत पत आणि सकारात्मक वाढीमुळे मागील 3 महिन्यांत अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. अनेक PSU बँकांनी मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावरून उसळी घेऊन आता मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अनेक PSU बँकांचे शेअर्स जून 2022 च्या तिमाहीत आपल्या नीचांक पातळीवर ट्रेड करत होते.

यूनियन बैंक ऑफ इंडिया :
या PSU बँकेच्या शेअरची किंमत 127 टक्के वधारली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक या PSU बँकेच्या शेअर्सनी आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक ट्रेडिंग स्तरावरून 100 टक्के पेक्षा जास्त उसळी घेतली आहे. या बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट प्रमाणात वाढवले आहे. यूनियन बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 127 टक्के मजबूत झाले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 33.55 रुपये होती. त्याचवेळी या बँकेचे शेअर 23 नोव्हेंबर 2022 रोजी 75.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

बैंक ऑफ बडोदा :
या PSU बँकेच्या शेअर्समध्ये 118 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सनी आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 118 टक्के उसळी घेतली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 77 रुपये होती. त्याच वेळी बँक ऑफ बडोदाचे शेअर 23 नोव्हेंबर 2022 रोजी 168.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 112 टक्के मजबूत झाले आहेत. इंडियन बँक या PSU बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 130.15 रुपये होती. त्याच वेळी 23 नोव्हेंबर 2022 रोजी बीएसई निर्देशांकावर या बँकेचे शेअर्स 275.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

PSU बँकांचे शेअर्स 95 टक्के वाढले :
बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि UCO बँकेचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 75-95 टक्के वधारले आहेत. या बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. पंजाब अँड सिंध बँक,पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक या सर्व PSU बँकाच्या शेअर्समध्ये 50 टक्के ते 70 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तथापि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 42 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

PSU बँकांमध्ये रैली :
PSU बँकांमध्ये नजीकच्या काळात सकारात्मक वाढ पाहायला मिळेल आणि ही वाढ सर्वकालीन उच्चांक पातळीवर जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बँक ऑफ अमेरिका या सिक्युरिटीज फर्मला विश्वास आहे की, क्रेडिट वाढ, लोकांपर्यंत चांगली पोहोच, अप्रतिम तिमाही निकाल, कमी NPA प्रमाण, यासर्व बाबीचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम दिसेल अशी आशा व्यक्त केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Bank Shares price has increased after announcing Profitable Quarterly Results on 24 November 2022.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Shares(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x