5 May 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या
x

अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार?

Vasant More

MNS Leader Vasant More | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. दुसरीकडे मनसेसाठी महत्वाच्या असलेल्या पुणे शहरात मात्र जमिनीवरील आणि लोकांशी जोडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांच राजकीय खच्चीकरण राज ठाकरेंच्या जवळील नेतेच करत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यापैकी पुण्यातील एक नेता हा राज ठाकरेंशी अत्यंत जवळीक असलेला असून त्या नेत्याचा सामान्य लोकांशी कोणताही संबंध नाही अशी माहिती आहे. राज ठाकरेंना भाषणावेळी काही राहून गेल्यास मागून चिठ्य्या पोचवताना या नेत्याला अनेकांनी पाहिला असेल. तसेच पुण्यात पक्ष विस्तार किंवा पक्ष संघटनेच्या बळकटीशी या नेत्याचा काडीचाही संबंध नसतो असं स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत.

कारण, मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांना मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. पण त्यांना भाषणच करू दिलं नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पुणे मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचीही चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे वसंत मोरे पुणे शहराध्यक्ष असूनही त्यांच्याविरोधात लॉबी काम करत आहे. मागील विधानसभेत देखील याच नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काम केलं होत असं वृत्त आहे. वास्तविक जनतेची कामं करणारा पदाधिकारी अशी वसंत मोरे यांची पुण्यात छबी आहे. मात्र अशा नेत्यांनी बाजूला जावं यासाठी जनतेशी कोणतीही बांधिलकी नसणारे नेते फिल्डिंग लावत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

पुण्यात मनसेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील मनसेच्या कार्यक्रमात वसंत मोरेंना बोलू दिलं नाही. त्यामुळे वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मोरेंना बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरेंना स्थानिक पदाधिकारी डावलत असल्याने वसंत मोरेंची नाराजी कायम आहे. त्यामुळे पुण्यात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद उफाळण्याची शक्यता आहे.

भाषणाच्या यादीत नावच नाही
या नाराजीच्या वृत्तावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी नाराज नाही. नाराज कार्यकर्ते आहेत. त्या दिवशी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात सर्व कोअर कमिटीचे मेंबर होते. मी त्या स्टेजवर आहे तर मला बोलू दिलं जाईल, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. पण मला त्या ठिकाणी बोलायची संधी मिळाली नाही, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. उलट कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का नाही भाषण केलं? असं विचारत होते. मी म्हटलं, भाषणाच्या यादीत माझं नावच नाही तर मी कसं भाषण करणार?, असं त्यांनी सांगितलं.

मे महिन्यातील राज ठाकरेंची ती सभा :
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मे महिन्यात पुण्यात एक सभा पार पडली होती. मात्र, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतली सभेपूर्वी मोरे बागेत बैठक घेतल्याने या बैठकीचीच पुण्यात जोरदार चर्चा रंगली होती. कारण वसंत मोरे यांच्या त्या बैठकीला मनसेचे पदाधिकारी [प्रचंड संख्येने उपस्थित होते. त्यावेळी वसंत मोरे यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे वसंत मोरे यांचा सारखा पदाधिकारी मनसेला सोडून गेल्यास पुण्यात मनसे निकामी झाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण राज ठाकरेंच्या करिष्म्याचे दिवस संपले आहेत आणि त्यांची राजकीय विश्वासहर्ता सध्या पणाला लागल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

MNS Vasant More

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pune MNS City President Vasant More is not happy because of internal politics check details on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#MNS Vasant More(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x