8 May 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाची ही योजना लोकांचे खिसे भरते आहे, दुप्पट परतावा मिळतोय, स्कीम डिटेल नोट करा

Tata Mutual Fund

Tata Mutual Fund | टाटा स्मॉल कॅप म्युचुअल फंडाच्या ओपन एंडेड इक्विटी फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. ही म्युचुअल फंड योजना फक्त स्मॉल कॅप कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये आपले पैसे लावते. या म्युचुअल फंड योजनेच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे स्मॉल कॅप कंपनीच्या इक्विटी शेअर्स संबंधित साधनांमध्ये पैसे लावून दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतवा कमावून देणे हा आहे. व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टार या दोन्ही फर्मनी या म्युचुअल फंड योजनेला 3 स्टार रेटिंग देऊन त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

फंड लाँचचा इतिहास :
12 नोव्हेंबर 2018 रोजी ही म्युचुअल फंड योजना लाँच करण्यात आली होती, आणि आतापर्यंत या योजनेने आपली चार वर्षे पूर्ण केली आहेत. ज्या लोकांनी योजनेत 10,000 रुपये लावून एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांना आता 8.39 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या म्युच्युअल फंड कंपनीने स्थापनेपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 30.65 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे.

टाटा स्मॉल कॅप फंडाची कामगिरी :
टाटा स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील वर्षी आपल्या गुंतवणुकदारांना निफ्टी स्मॉल कॅप-250 TRI निर्देशांकाच्या 4.50 टक्के परताव्याच्या तुलनेत 16.18 टक्के परतावा कमवून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती, म्हणजे वार्षिक 1.20 लाख गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1.30 लाख रुपये झाले आहेत.

निफ्टी स्मॉलकॅप-250 TRI इंडेक्सच्या कामगिरीच्या तुलनेत टाटा स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 34.89 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केल्यास मागील तीन वर्षात 3.60 लाख गुंतवणूक झाली आणि, आता तिचे मूल्य वाढून 5.90 लाख रुपये झाले आहे. निफ्टी स्मॉलकॅप-250 TRI इंडेक्सने 25.50 टक्के परतावा दिला आहे, या तुलनेत स्थापनेपासून आतापर्यंत टाटा स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने 30.65 टक्के वार्षिक SIP कमावून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती, त्यांची 4.70 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक झाली होती, आणि आता त्याचे मूल्य वाढून 8.39 लाख रुपये झाले आहे.

टाटा स्मॉल कॅप फंड बद्दल :
टाटा स्मॉल कॅप म्युचुअल फंड NIFTY Smallcap 250 TRI निर्देशांक बेंचमार्क म्हणून फॉलो करतो. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाचा AUM 2664.24 कोटी रुपये आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाची NAV एकूण 24.7869 होती. आणि नियमित पर्यायांसाठी NAV 22.9871 होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Mutual Fund small Cap Scheme for investment and earning huge returns on 28 November 2022.

हॅशटॅग्स

#Tata Mutual Fund(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x