2 May 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
x

Penny Stock | मोठी संधी? 3907 टक्के परतावा देत करोडपती बनवणारा हा शेअर 54 टक्क्याने स्वस्त झालाय? खरेदी करावा का?

Multibagger Penny Stock

Penny Stock | आज या लेखात आपण ज्या कंपनीच्या शेअरबद्दल माहिती घेणार आहोत, त्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. मागील सहा महिन्यांपासून या कंपनीचा शेअर सातत्याने पडताना दिसत आहे. मागील काही महिन्यात या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांनी आपली 54 टक्के गुंतवणूक गमावली आहे. सध्या बीएसई आणि एनएसई वर हा स्टॉक ट्रेड करणे बंद झाला आहे. ज्या लोकांनी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी अवघ्या 6 महिन्यांत आपली निम्म्याहून अधिक गुंतवणुक गमावली आहे. जे लोक या स्टॉक मधून बाहेर येऊ शकले नाही, त्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आपण ज्या कंपनीच्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, SEL Manufacturing Limited.

शेअरची वाटचाल आणि किंमत :
SEL मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यांपूर्वी NSE निर्देशांकावर 1157 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या स्टॉकची किंमत 540.95 रुपयेपर्यंत घसरली आहे. या कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग 21 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांत या स्टॉकची किंमत जवळपास 54 टक्केपेक्षा अधिक पडली आहे. सहा महिन्यांपूर्वी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 46,000 रुपये झाले असते.

एका वर्षात मजबूत परतावा :
या वर्षी आतापर्यंत YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,118.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 3,907.04 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी या कंपनीचा शेअर 13.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच या किमतीवर एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आता 40 लाखांहून अधिक नफा मिळाला असणार. मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळाली आहे. या पडझडीचे कारण म्हणजे कंपनी मागील काही काळापासून तोट्यात चालली आहे.

कंपनीचा व्यवसाय :
SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही मुख्यतः कापड उद्योग क्षेत्रात गुंतलेली कंपनी आहे. कंपनी कापड उत्पादन, त्यावर प्रक्रिया याशिवाय रेडिमेड कपडे उत्पादन आणि विविध प्रकारच्या टॉवेलचे उत्पादन, विक्री, विपणन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock Of SEL Manufacturing limited Share price has fallen down and Treding has been blocked on 28 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x