11 December 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

IPO Investment | आयपीओ गुंतवणूक हलक्यात घेऊ नका, वर्षभरात 25 ते 95 टक्के परतावा देत आहेत, ही स्टॉकची यादी सेव्ह करा

IPO investment

IPO Investment | 2022 या वर्षात शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली आहे. या काळात शेअर बाजारात चढ उताराचा चक्र इतक्या वेगाने फिरले आहे की, गुंतवणुकदारही चक्रावून गेले आहेत. कधी बाजारात वाढ दिसून येते, तर दुसऱ्या शेअर बाजार पडलेला असतो. एकूणच, या वर्षी आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये फक्त 2.5 ते 3 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात पडझड कायम असताना गुंतवणूकदारांनी आयपीओ मध्ये गुंतवणूक वाढवली आहे. आयपीओ मार्केटमध्ये ही असे काही शेअर्स आले होते, ज्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली होती. 2022 मध्ये, मेनबोर्डवर आतापर्यंत 23 IPO सूचीबद्ध झाले आहेत. यापैकी या 23 पैकी 17 IPO नी आपल्या गुंतवणुकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. यामध्ये व्यवहारात गुंतवणूकदारांची संपत्ती 2 ते 3 पट वाढली आहे.

2022 मध्ये सूचीबद्ध झालेले IPO ज्यांनी 100 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला होता
2022 या वर्षात 23 पैकी 4 असे IPO बाजारात सूचीबद्ध झाले आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 100.टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. यामध्ये व्हरांडा लर्न, व्हीनस पाईप्स, अदानी विल्मर आणि रुची सोया इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.

व्हेरांडा लर्न :
या कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमांतून गुंतवणूकदारांना 131 टक्के परतावा कमवून दिला आहे. 11 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 137 रुपये निश्चित केली होती आणि शेअरची लिस्टिंग 171 रुपयेवर झाली होती. सध्या या कंपनीचा शेअर 317 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

व्हीनस पाईप्स :
या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 131 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. 326 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत स्टॉक 352 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. सध्या या शेअरची किंमत 752 रुपयांवर पोहोचली आहे.

अदानी विल्मर :
या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी 210 टक्के परतावा कमावला आहे. हा स्टॉक 8 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. 230 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर 274 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 713 रुपयांवर पोहोचली आहे.

रुची सोया इंडस्ट्रीज :
या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 117 टक्के परतावा मिळवून दिला आहे. रुची सोया कंपनीचे शेअर्स 8 एप्रिल 2022 रोजी 650 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 925 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. सध्या या कंपनीचा शेअर 1410 रुपयांवर ट्रेड करत आहे.

2022 मध्ये सूचीबद्ध झालेले IPO ज्यांनी 50 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला :

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट :
या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

एथर इंडस्ट्रीज :
50 टक्के लिस्टिंग परतावा कमावून दिला होता.

कॅम्पस अॅक्टिव्ह :
या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला होता.

हरिओम पाइप :
या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला होता.

वेदांत फॅशन्स :
या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणुकदारांना 66 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला होता.

या शेअर्सची कमाई देखील लक्षणीय होती : 

हर्षा इंजिनियर्स :
या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला होता.

ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेस :
कंपनीच्या शेअरने 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Syrma SGS :
या कंपनीच्या शेअरने 29 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला आहे.

eMudhra :
या कंपनीच्या शेअरने 32 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला आहे.

Ethos :
कंपनीच्या शेअरने 12 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला आहे.

प्रुडंट अॅडव्हायझर :
या कंपनीच्या शेअरने 27 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला आहे.

रेनबो चाइल्ड :
या कंपनीच्या शेअरने 31 टक्के लिस्टिंग प्रॉफिट मिळवून दिला आहे.

या 6 IPO ने केले नुकसान : 

AGS Transact :
या कंपनीच्या शेअर गुंतवणूकदारांचे 53 टक्के नुकसान केले आहे.

उमा एक्सपोर्ट :
या शेअरने 30 टक्के लिस्टिंग लॉस केला आहे.

एलआयसी इंडिया :
या कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांचे 36 टक्के नुकसान केले आहे.

डेल्हीवरी :
या कंपनीच्या शेअर ने गुंतवणूकदारांचे 24 टक्क्याचे नुकसान केले आहे.

TMB :
या कंपनीने 5 टक्के नकारात्मक परतावा दिला होता.

Tracxn Technologies : हा स्टॉक लिस्टिंग च्या दिवशी 14 टक्क्यांनी पडला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment stocks has listed on Stock market in this current year and given profit so far on 09 November 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x