8 May 2024 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घरवापसी

Shivsena, MNS, Maharashtra navnirman sena, uddhav thackeray, raj thackeray, sharad sonawane

मुंबई – “सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत! शिवसेनेत फक्तं वाघच राहू शकतात आणि जो शिवसेनेचा आहे तो शिवसेनेत परत आला आहे” असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचं पक्षात स्वागत केलं. मी सोनावणेंना म्हटलं होतं शिवसेनेत प्रवेश करा, जुन्नर तर आपलंच आहे, शिरूर तर आपलंच आहे. तुम्ही काही दिवस बाहेर होतात पण तिथे आनंदी होतात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला त्यावर शरद सोनावणे यांनी नाही असे उत्तर दिले. सोनावणे पक्षाबाहेर होते मात्र त्यांच्या मनात भगवा होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच जुन्नरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.आज मुंबईतील शिवसेना भवनात शरद सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. लोकसभेत असा विजय मिळवा की पुढच्या वेळी आपल्या विरोधात एबी फॉर्म भरण्याचीही हिंमत कोणी दाखवायला नको असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी हा एक धक्का आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी हातावर शिवबंधन बांधले. मनसेच्या सहा नगरसेवकांनी मनसेला रामराम केला आणि आता त्यापाठोपाठ एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांनी शरद सोनावणेंच्या पक्ष प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला होता आणि असं झाल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊ अशी धमकी वजा इशारा दिला होता. परंतु जुन्नर शिवसैनिकांना विश्वासात घेऊनच आपण निर्णय घेऊ अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत शरद सोनावणेंना शिवसेनेत प्रवेश दिला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x