
Quick Money Share | जगात आर्थिक मंडी येण्याचे संकेत मिळत आहेत, सोबतच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगातील सर्व शेअर बाजारात गोंधळ आणि चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र या कठीण काळात अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. हाय-टेक पाईप्स ही अशीच एक कंपनी आहे, जिने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हाय-टेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक आता 825 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, ते आता मालामाल झाले असणार. गुंतवणूकदारांसाठी खुश खबर आहे की, ब्रोकरेज फर्म शेरेखानने या कंपनीच्या शेअरसाठी 910 रुपये ही लक्ष किंमत निश्चित केली आहे.
ब्रोकरेज फर्म शेअरखानने जाहीर केलेल्या अहवालानुसार,”एप्रिल 2022 पासून हॉट रोल्ड कॉइलच्या किमतीत दबाव येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चायनीज हॉट रोल्ड कॉइल्सची सरासरी निर्यात किंमत तिमाही-दर-तिमाही 2 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याच वेळी जगात स्टीलच्या किमतीतही सुधारणा होताना दिसून येत आहे “. ब्रोकरेज फर्मच्या मते हायटेक पाईप्स कंपनीचे प्रवर्तक आणि गैर प्रवर्तक 415 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहेत.
मागील 1 महिन्यात 26 टक्क्यांचा परतावा
शेअरखान फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बाजारातील सकारात्मक घटक हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स वाढवतील. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की,” आम्ही या स्टॉकच्या कामगिरीबद्दल सकारात्मक आहोत. आगामी काळात हा स्टॉक 15 टक्क्यांपर्यंत वाढेल. या वर्षी हायटेक पाईप्स कंपनीच्या शेअर्समध्ये 54.84 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समधे पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे आता 70 टक्क्यांनी वाढले आहे. मागील 1 महिन्यात हाय टेक पाईप्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्क्यांचा जबरदस्त नफा कमवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.