28 April 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा
x

मोदींच्या गुजरातमधूनच काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ

Congress, Loksabha Election, Gujarat state

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजरातच्या अहमदाबाद शहरात होणार आहे. या बैठकीसाठी कॉंग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या होमपिचची निवड केल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

कॉंग्रेसने कार्यकारिणी बैठकीसाठी याआधी २८ फेब्रुवारी हा दिवस निश्‍चित केला होता. परंतु, पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील शिगेला पोहचलेला तणाव या पार्श्‍वभूमीवर ही बैठक लांबणीवर टाकण्यात आली. आता या बैठकीसाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे कार्यकारिणी बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेस मोदी आणि शहांच्या होमपिचवरून निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करेल. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. गुजरातमध्ये तब्बल ५८ वर्षांच्या खंडानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x