26 January 2025 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घरवापसी

Shivsena, MNS, Maharashtra navnirman sena, uddhav thackeray, raj thackeray, sharad sonawane

मुंबई – “सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत! शिवसेनेत फक्तं वाघच राहू शकतात आणि जो शिवसेनेचा आहे तो शिवसेनेत परत आला आहे” असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचं पक्षात स्वागत केलं. मी सोनावणेंना म्हटलं होतं शिवसेनेत प्रवेश करा, जुन्नर तर आपलंच आहे, शिरूर तर आपलंच आहे. तुम्ही काही दिवस बाहेर होतात पण तिथे आनंदी होतात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला त्यावर शरद सोनावणे यांनी नाही असे उत्तर दिले. सोनावणे पक्षाबाहेर होते मात्र त्यांच्या मनात भगवा होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच जुन्नरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.आज मुंबईतील शिवसेना भवनात शरद सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. लोकसभेत असा विजय मिळवा की पुढच्या वेळी आपल्या विरोधात एबी फॉर्म भरण्याचीही हिंमत कोणी दाखवायला नको असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी हा एक धक्का आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी हातावर शिवबंधन बांधले. मनसेच्या सहा नगरसेवकांनी मनसेला रामराम केला आणि आता त्यापाठोपाठ एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांनी शरद सोनावणेंच्या पक्ष प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला होता आणि असं झाल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊ अशी धमकी वजा इशारा दिला होता. परंतु जुन्नर शिवसैनिकांना विश्वासात घेऊनच आपण निर्णय घेऊ अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत शरद सोनावणेंना शिवसेनेत प्रवेश दिला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x