15 December 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

शासकीय नियम: मनसेकडून ईडीलाच नोटीस; कार्यालयाचा बोर्ड मराठी भाषेत करा...सक्ती आहे

Raj Thackeray, Amit Thackeray, MNS, MNS Party, ED Notice, ED Office, Marathi patya, Marathi Language

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नियमाचे आणि कायद्याचे पालन करत ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. त्यानंतर महाराष्ट्र सैनिक चवताळून उठले आहेत. राज ठाकरे यांच्या पाठी ईडीचा डाव आखून सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सैनिकांनी केला होता. रस्त्यावर देखील राडा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं.

मात्र त्यानंतर संतापलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी समाज माध्यमांवर राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यावरच भडास काढली आणि काही क्षणात त्या अधिकाऱ्याने देखील बातम्या प्रसिद्ध होताच स्वतःचा प्रोफाइल डिलीट मारला. तसं म्हटलं तर अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस मिळाली की बऱ्याच नेत्यांना धडकी भरते. कारण केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या ईडीच्या विरोधात कोणी फार काही करू शकत नाही असा समज आहे.

परंतु या ईडीला देखील मनसे कार्यकर्ते रडीला आणत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आता ईडीलाच मनसेच्या आणि कायद्याच्या भाषेत नोटीस देण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाली आहे. या ईडीने एक नियमभंग केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची काल ईडीने चौकशी केली. त्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला. मात्र आंदोलन करण्याचे टाळले. त्यांना आता एक कायदेशीर मुद्दा मिळाला आहे. मुंबईत ईडीच्या कार्यालयाचा नामफलक हिंदी आणि इंग्रजीत आहे. शासकीय नियमानुसार स्थानिक भाषेत म्हणजे मराठीतही हा फलक असायला हवा. सर्व शासकीय कार्यालयांना तशी सक्ती आहे. परंतु ईडीने कायद्याचं सरळसऱळ उल्लंघन केले आहे. तसे न केल्यास दंडाचीही तरतूद आहे. याबाबत मनसेने मराठी भाषा विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच ईडीलाही त्याची प्रत पाठविली आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x