2 July 2020 9:02 PM
अँप डाउनलोड

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश नाही तर 'महाबोलबच्चन यात्रा'

Devendra fadnavis, Dr Amol Kolhe, Mahajanadesh yatra, NCP, BJP

पाथरी : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाथरी येथील राष्ट्रवादीच्या यात्रेत भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदवीची देखील यावेळी अमोल कोल्हेंनी खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळालं. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाजानदेश यात्रेवर देखील अमोल कोल्हे यांनी भाष्य करत फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

उपस्थितांना संबोधित करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाने कामंच केली नाही म्हणून महाजनादेश यात्रेत पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे’. मुख्यमंत्री शिक्षणाने एमबीए आहेत. मात्र त्यांच्या पदवीचा आदर करुन सांगतो आज ती पदवी म्हणजे ‘महाबोलबच्चन यात्रा’ झाली आहे अशी जोरदार टीका यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आणि मुख्यमत्र्यांचं महाजानदेश यात्रेची पोलखोल केली.

दरम्यान पाथरीच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या धोरणांवर टीका केली, खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, १६ हजार भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसले गेले आहे, मग मुख्यमंत्री कुणावर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल करत प्रत्येक बाबतीत बळीराजाच्या तोंडाला पाने सरकारने पुसलीय अशी जोरदार टीका केली.

प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम विद्यमान सरकार करत आहे.त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेचं काहीही देणेघेणे नाही. आज आपण सुपात आहोत उद्या मंदीमुळे जात्यात जाणार आहोत हे लक्षात घ्या असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. तसेच सरकारच्या विरोधात कोण बोलायला कोण लागलं की लगेच सीबीआय, ईडीचा घडीबुवा अंगावर सोडला जातोय. सध्या हुकुमशाही सुरु आहे हे लक्षात घ्या असा इशाराही कोल्हेंनी दिला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#AmolKolhe(10)#Devendra Fadnavis(443)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x