3 May 2024 5:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Focus Lighting and Fixtures Share Price | या मल्टीबॅगर शेअरने 600% परतावा दिला, अशा स्टॉकमध्ये पैसा वाढतो, स्टॉक डिटेल्स

Focus Lighting and Fixtures Share price

Focus Lighting and Fixtures Share Price | फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर्स लिमिटेड कंपनीच्या ​​शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक NSE SME निर्देशांकावर मागील एका वर्षात 75 रुपये किमती वरून 313.70 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी हे शेअर खरेदी केले होते, त्यांना 300 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे. हा IPO स्टॉक SME मल्टीबॅगर शेअर पैकी एक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Focus Lighting and Fixtures Share Price | Focus Lighting and Fixtures Stock Price | NSE FOCUS)

मार्च 2017 मध्ये फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर्स लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक NSE SME निर्देशांकावर 45 रुपयांच्या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. फोकस लाइटिंग कंपनीचे शेअर सध्या 313.70 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकने मागील सहा वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

फोकस लाइटिंग शेअरचा किंमत इतिहास :
फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ 45 रुपये प्रति शेअर या प्राइस बँडवर खुला करण्यात आला होता. 13 एप्रिल 2017 रोजी NSE SME निर्देशांकावर हा IPO सूचीबद्ध झाला. या एसएमई स्टॉकची मार्केटमधील सुरुवात जबरदस्त होती, आणि स्टॉक 45 रुपयांच्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 54 रुपये प्रति शेअर या किमतीवर लिस्ट झाला होता. कंपनीच्या नशीबवान शेअर्स धारकांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 20 टक्के प्रीमियम प्रॉफिट मिळाला होता. त्यावेळी जर तुम्ही या एसएमई कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून आतापर्यंत ठेवली असती तर आज तुमचे 45 रुपये किमतीचे शेअर्स 313.70 रुपये किमतीवर गेले असते. या जबरदस्त वाढीमुळे गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये पैसे लावून 600 टक्क्यांचा बंपर परतावा कमावला आहे.

गुंतवणूकदारांच्या पैशात वाढ :
या SME कंपनीच्या IPO मध्ये किंमत बँड 45 रुपये प्रति शेअर या दराने ऑफर करण्यात आली होती. या IPO मध्ये गुंतवणुकदारांना लॉटमध्ये अर्ज करणे आवश्यक होते. एका लॉटमध्ये कंपनीच्या 3000 शेअरचा समावेश होता. गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 1.35 लाख रुपये खर्च करावे लागले. त्यामुळे, जर तुम्ही या मल्टीबॅगर स्टॉक कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या 1.35 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 9.45 लाख रुपये झाले असते.

फोकस लाइटिंग कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग :
फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. स्टॉकची ट्रेडिंग 318 कोटीच्या ट्रेडिंग व्हॉल्यूमसह शुक्रवारी पूर्ण झाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक व्हॉल्यूम 30,000 पेक्षा अधिक होती. तर मागील 20 दिवसांत स्टॉक सरासरी व्हॉल्यूम 1,38,702 होती. याचा अर्थ मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE SME निर्देशांकावरील या कंपनीच्या शेअर्सचे व्हॉल्यूम प्रमाण मागील 20 दिवसांच्या सरासरी व्हॉल्यूमपेक्षा खूपच कमी होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 333.90 रुपये आहे, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 71.25 रुपये होती. या NSE SME कंपनीच्या स्टॉकची बुक व्हॅल्यू 34.54 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Focus Lighting and Fixtures Share price in focus check details on 15 January 2023.

हॅशटॅग्स

Money Making Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x