
Multibagger Stock | जगातील सर्व शेअर मार्केटमध्ये चढ-उतार आणि गोंधळ पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सध्या आपल्या सार्वकालीन उच्चांक स्तरावर ट्रेड करत आहे. स्टॉक मार्केटमधील तेजीच्या काळात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहे. आज या लेखात आपण अशाच एका शानदार स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत,ज्याने मागील काही काळात कमालीची कामगिरी केली आहे.
आपण ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे,”सूरज प्रोडक्ट्स”. सूरज प्रोडक्ट्स कंपनीचे शेअर्स (Multibagger Stock of Suraj Products Share Price) गेल्या काही ट्रेडिंग सेशनपासून तेजीत आले आहेत. त्याच वेळी सूरज प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या अगदी जवळ ट्रेड करत आहेत. मागील 5 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट केले आहे.
सूरज प्रोडक्ट्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 157.40 रुपये आहे. त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 67.60 रुपये होती. गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे स्टॉक 0.80 रुपयांच्या कमजोरी सह 133.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
दुसरीकडे जर आपण सूरज प्रोडक्ट्स कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, मागील पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने कमालीची कामगिरी केली आहे. सूरज प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 23 जून 2022 रोजी 71.15 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर हळूहळू स्टॉकची किंमत वाढत गेली. 30 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने ट्रेडिंग दरम्यान 139.90 रुपये किंमत स्पर्श केली होती. अशा परिस्थितीत अवघ्या 5 महिन्यांत या शेअरचे मूल्य दुप्पट झाले आहे.
Multibagger Stock of Suraj Products Stock Price
एक काळ असा होता जेव्हा या कंपनीचे शेअर 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 सप्टेंबर 2010 रोजी सूरज प्रोडक्ट्स कंपनीचे शेअर्स 10.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून 2018 या सालापर्यंत हा शेअर 10 रुपयांवरून वाढून 20-22 रुपयांपर्यंत गेला होता. 2018 नंतर या स्टॉकमध्ये कमालीची वाढ झाली असून सध्या तो मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत सामील झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.