Chandrakant Patil | राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पिंपरी शहरात शाईफेक करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं.
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. विशेष म्हणजे अशाप्रकारची घटना घडू शकते, अशी शंका पोलिसांनी आधीच होती. मात्र तरीही ही अनपेक्षित घटना घडलीय.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील :
शुक्रवारी, औरंगाबाद येथे एका कार्यक्रमा दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या.शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही.तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत. असे विधान केल्यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेते आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Chandrakant Patil ink thrown at Pimpari check details on 10 December 2022.
