12 December 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

35 Companies IPO in 2021 | ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारण्याच्या तयारीत | शेअर गुंतणूकदारांमध्ये उत्सुकता

35 companies IPO in 2021

मुंबई, ०४ ऑक्टोबर | शेअर मार्केटची सध्या घोडदौड सुरू असून, गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत अनेकविध कंपन्यांचे IPO (35 Companies IPO in 2021) शेअर मार्केटमध्ये येऊन धडकल्याचे पाहायला मिळाले. अनेक नव्या कंपन्यांनी एन्ट्रीलाच दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले, तर काही कंपन्यांनी निराशाच पदरी पाडली.

35 Companies IPO in 2021. The IPO is expected to flood in the October-December quarter. About 35 companies are planning to raise Rs 80,000 crore in the third quarter of the current financial year :

३५ कंपन्याकडून अर्ज:
ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत IPO चा महापूर येणार असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ३५ कंपन्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ८० हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहेत. यामध्ये पेटीएम, आधार हाऊसिंग फायनान्स, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, पॉलिसीबाजार आणि अदानी विल्मर सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

१४ कंपन्यांना मंजुरी:
IPO आणण्यासाठी बाजार नियामक सेबीकडून १४ कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये परदीप फॉस्फेट्स, गो एअरलाइन्स, रुची सोया इंडस्ट्रीज, आरोहन फायनान्शिअल सर्व्हिसेस, उत्कर्ष स्मॉल फायनान्स आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स यांचा समावेश आहे. या कंपन्या सुमारे २२ हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. तर दुसरीकडे, ६४ कंपन्यांनी आयपीओ (IPO) साठी सेबीकडे DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स) दाखल केले आहेत.

पॉलिसीबझार आणि नायकाचे आयपीओ या ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहेत. त्यांचा आकार अनुक्रमे ६ हजार कोटी आणि ४ हजार कोटी रुपये असू शकतो. चेन्नईस्थित स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थचा ७ हजार कोटी रुपयांचा आयपीओ या वर्षाच्या अखेरीस येऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: 35 companies IPO in third quarter of 2021.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x