15 May 2025 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

बिग ब्रेकिंग! अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं मत कोर्टाने नोंदवलं, CBI प्रकरणातही जामीन मंजूर, पण...

Anil Deshmukh

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे. देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याची मत कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे देशमुख आता 13 महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.

तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा दावा
सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आज याबद्दल निकाला दिला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयनं विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेले आहेत. याप्रकरणात ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख सहा महिन्यांपर्यंत यंत्रणांच्या समोर आले नव्हते.

सीबीआयचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय
अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आक्रमक भूमिका मांडली. सीबीआयने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनिल देशमुख यांच्या जामिनावर 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former Home Minister Anil Deshmukh got bail in CBI case too check details on 12 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Anil Deshmukh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या