18 May 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Bank FD Vs Bank Share | होय! या सरकारी बँकेचा शेअर फक्त 33 रुपयांना आहे, 6 महिन्यांत 200% परतावा, खरेदी करणार?

Sarkari Bank share

Bank FD Vs Bank Share | मागील काही आठवड्यापासून बँक निफ्टीमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. बँकिंग सेक्टरमधील स्टॉक मार्केट मधील गोंधळाचा काहीच परिणाम होताना दिसत नाही आहे. परिणाम स्वरूप सरकारी बँकांचे शेअर्स मागील काही दिवसांपासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. सरकारी क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधित बक्कळ कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK)

गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट
अशीच एक सरकारी बँक आहे, ज्यात पैसे लावून लोकांनी जबरदस्त नफ्याची लूट केली आहे. अवघ्या एका महिन्यात UCO बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट केले आहेत. एका महिन्यापूर्वी हा शेअर 14.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, मात्र आता स्टॉक 33.25 रुपयांवर पोहचला आहे. आज UCO बँकेच्या शेअरमध्ये सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. युको बँकेच्या शेअरने 14.46 टक्क्यांचा बाऊन्स घेतला आणि शेअर 33.25 रुपये किमतीवर बंद झाला आहे.

5 दिवसात 48 टक्के परतावा :
युको बँकेच्या शेअरमध्ये मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या बँकेच्या शेअरने मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 48 टक्क्यांनी वाढवले आहेत. आज या बँकेचा शेअर 30.60 रुपयांवर ओपन झाला होता. स्टॉक दिवसा अखेर 34.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.

6 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिक परतावा :
युको बँकेच्या शेअरने मागील सहा महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले. अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीत या बँकेच्या शेअरची किंमत 207 टक्क्यांनी वाढली आहे. या 6 महिन्यांपूर्वी UCO बँकेचे शेअर्स 11.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, पण आता स्टॉक मध्ये जबरदस्त वाढ झाली असून शेअर 33.25 रुपयेवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी UCO बँकेच्या स्टॉकवर एक लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2 लाख 70 हजार रुपये झाले आते. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 10.55 रुपये आहे. युको बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात लोकांना 157 टक्के रिटर्न्स दिले आहेत. स्टॉकचा मागील 5 वर्षांचा रेकॉर्ड खराब आहे. UCO बँकेच्या स्टॉकने मागील 5 वर्षात फक्त 15 टक्के रिटर्न दिले आहेत.

स्टॉकमध्ये तेजीचे कारण :
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत UCO बँकेने ठीकठाक कामगिरी केली आहे. तिमाही निकालानुसार UCO बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 10.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेच्या निव्वळ उत्पन्नात 1769.60 कोटी रूपयेची वाढ झाली आहे. आज UCO बँकेचे शेअर 30.60 रुपये किमतीवर ओपन झाले होते. स्टॉकने 34.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. युको बँकेच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.55 रुपये होती. फक्त एका महिन्यात, UCO बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bank FD Vs Bank Share of UCO bank Share Price has doubled Money of investors in one month on 15 December 2022.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x