17 May 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Multibagger Stock | अजून काय हवं? 172% परतावा प्लस डिव्हिडंड आणि वारंवार अप्पर सर्किट, खिसे पैशाने भरणाऱ्या स्टॉकची माहिती

Multibagger Stock

Multibagger Stock | नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्सवर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर लागून 513.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 33.39 टक्क्यांनी वाढली आहे. नर्मदा जिलेटिन कंपनीने विशेष अंतरिम लाभांश जाहीर करताच शेअर्समध्ये तेजी आली आणि स्टॉक अप्पर सर्किटवर लागला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Narmada Gelatines Share Price | Narmada Gelatines Stock Price | BSE 526739)

स्टॉकमध्ये आलेल्या तेजीचे कारण :
विशेष रसायन उत्पादन व्यवसायाशी संबंधित नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 100 रुपये विशेष लाभांश वाटप करणार आहे. या कंपनीने मागील आठवड्यात स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 1000 टक्के विशेष अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा विशेष लाभांश 2022-23 या आर्थिक वर्षासाठी देण्यात येणार आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना 30 दिवसांच्या आत लाभांश वितरीत करेल. ही बातमी येताच शेअर्समध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे.

एका वर्षात दिला 172.37 टक्के परतावा :
नर्मदा जिलेटिन्स लिमिटेडने 2022 या वर्षी YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 172.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. या दरम्यान शेअर 188.55 रुपयांवर ट्रेड करत, मात्र त्यात आता वाढ झाली असून शेअरची किंमत 513.55 रुपयांवर गेली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 191.87 टक्क्यांनी वधारली आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 130.45 टक्के मजबूत झाली आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 222 रुपयांवरून 513.55 रुपयेवर गेली आहे. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीने 46.38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि कंपनीचे मागील तिमाहीत 2.84 कोटी रुपये नफा कमावला होता. भारतीय जिलेटिन बाजारपेठेत ही कंपनी मार्केट लीडर म्हणून व्यापार करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Narmada Gelatins share price has touched upper circuit after getting mews of interim dividend on 15 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x