
Multibagger Stock | इव्हान्स इलेक्ट्रिक या व्यावसायिक सेवांशी संबंधीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. मल्टीबॅगर कंपनी इव्हान्स इलेक्ट्रिक आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना त्यांनी होल्ड केलेल्या एका शेअरवर 1 बोनस शेअर देणार आहे. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 16 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या बैठकीत आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evans Electric Share Price | Evans Electric Stock Price | BSE 542668)
बोनस शेअर घोषणेनंतर स्टॉक वाढला :
कंपनीने बोनस शेअरची घोषणा करताच शेअर्सनी ट्रेडिंग सेशनमध्ये आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीमध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम कमालीचा वाढला होता. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांची अप्पर सर्किटवर 411.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 411.65 रुपये आहे. तथापि ट्रेडिंग सेशनच्या शेवटच्या काही तासात BSE वर शेअरची किंमत 4.09 टक्क्यांच्या वाढीसह 408.10 रुपयांवर पोहचली होती. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 70 रुपये होती.
गेल्या 5 महिन्यात ज्या लोकांनी इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आता 5 लाखांहून अधिक परतावा मिळाला आहे. अवघ्या 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 450 टक्के परतावा मिळवून दिला आहे. BSE वर 14 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 72.95 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 16 डिसेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर 408.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 14 जुलै 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुम्हाला 5.59 लाख रुपये नफा झाला असता.
इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीच्या भाग भांडवलात प्रवर्तकांची हिस्सेदारी 59.44 टक्के आहे. कंपनीचे बाजार भांडवल 56 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 14.18 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीने एकूण 2.73 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.