Adani Group Shares | गौतम अदानींबाबत धक्कादायक खुलासा, या 2 कंपन्यांची मालिक नाही, सत्य समोर येतं आहेत
Adani Group Shares | हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या गौतम अदानीयांच्याबाबत एक नवी बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षी अदानी समूहाने विकत घेतलेल्या दोन सिमेंट कंपन्यांचे (अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी) खरे मालक गौतम अदानी नाहीत. अंबुजा सिमेंट आणि एसीसी ची मालकी गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्याकडे आहे.
सीएनबीसी-टीव्ही 18 च्या वृत्तानुसार, अदानी समूहाने स्पष्ट केले आहे की एसीसी आणि अंबुजा सिमेंटचा व्यवसाय विनोद अदानी यांच्या नियंत्रणाखालील एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटअंतर्गत येतो. म्हणजे सिमेंट कंपनीच्या व्यवसायावर गौतम अदानी यांचे थेट नियंत्रण नाही. गेल्या वर्षी अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी लिमिटेडच्या अधिग्रहणाची घोषणा केली होती. मात्र, कराराच्या वेळीही समूहाने एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटचा उल्लेख केला होता. हा करार स्विस कंपनी होल्सिमसोबत करण्यात आला होता.
या अधिग्रहणाचे एकूण मूल्य ६.५० अब्ज डॉलर्स आहे. अदानी समूहाचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. यासह, देशातील उत्पादन आणि सामग्री श्रेणीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विलीनीकरण आणि अधिग्रहण करार आहे. सध्या अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीची एकत्रित स्थापित क्षमता वार्षिक ६७.५ दशलक्ष टन आहे.
विनोद अदानी यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत
जानेवारी महिन्यात हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात ‘आम्हाला विनोद अदानी आणि सुबीर मित्रा (अदानीच्या खाजगी कौटुंबिक कार्यालयाचे प्रमुख) यांच्याशी संबंधित किमान 38 मॉरिशस कंपन्या आढळल्या असं म्हटलं होतं. सायप्रस, यूएई, सिंगापूर आणि विविध कॅरिबियन आयलंड’सारख्या इतर टॅक्स हेवन देशांमध्येही आम्हाला विनोद अदानीयांच्याशी संबंधित संस्था सापडल्या.
हिंडेनबर्गचा अहवाल जानेवारीत आला होता
हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला. यात गौतम अदानी आणि अदानी समूहावर शेअरच्या किमतीत फेरफार, करचुकवेगिरीसह अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, अदानी समूहाने या आरोपांवर स्पष्टीकरण देत ते निराधार असल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतरही गौतम अदानी यांना मोठा तोटा सहन करावा लागला आणि त्यांच्या शेअर्सची किंमत ८२ टक्क्यांनी घसरली. अब्जाधीशांच्या यादीतही ते पिछाडीवर राहिले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Adani Group Shares Vinod Adani owns Ambuja Cements and ACC check details on 15 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट