 
						Multibagger Mutual Funds | कोटक म्युचुअल फंड स्कीम भारतीय म्युचुअल फंड बाजारात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. म्हणून आज या लेखात आपण कोटक म्युचुअल फंड द्वारे राबवल्या जाणाऱ्या टॉप 5 योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. कोटक म्युच्युअल फंडाच्या या टॉप 5 योजनांनी 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहे. चला तर मग या योजनाचा थोडक्यात आढवा घेऊ.
गुंतवणूक कंपनी BPN Fincap च्या तज्ज्ञांच्या मते साधारणपणे म्युच्युअल फंड योजना 3 वर्षात उत्तम परतावा कमावून देतात. जर गुंतवणूकदारांनी किमान 5 ते 10 वर्षे ही गुंतवणूक चालू ठेवली तर, त्यांना दीर्घ काळात खूप चांगला परतावा मिळू शकतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवायचा असेल तर, त्यांनी 5 वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक करावी.
1) कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 34.19 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.75 लाख रुपये परतावा देते.
2) कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 26.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.18 लाख रुपये रिटर्न्स देते.
3) कोटक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 26.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.17 लाख रुपये रिटर्न्स देते.
4) कोटक पायोनियर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 21.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.92 लाख रुपये रिटर्न्स देते.
5) कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 20.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.81 लाख रुपये रिटर्न्स देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		