3 May 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Avalon Technologies Share Price Today | हा नवीन शेअर स्वस्तात लिस्ट झाला, स्टॉकमध्ये मजबूत तेजी होती, शेअरचं पुढे काय होणार?

Avalon Technologies Share Price

Avalon Technologies Share Price Today | ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ने आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहे. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरची लिस्टिंग अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या कंपनीचे शेअर्स 431 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले. आणि शेअरची किंमत 426 रुपये पर्यंत झाली आली होती. (Avalon Technologies Limited)

आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 2.01 टक्के वाढीसह 406.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट लिमिटेड’ फर्मचे तज्ञ म्हणतात की, कंपनीची आर्थिक बाजू मजबूत आणि स्थिर असूनही कंपनीच्या PAT मध्ये घट झाली आहे. उच्च जोखीम घेऊन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हा स्टॉक दीर्घ काळासाठी होल्ड करून परतावा मिळवू शकतात.

‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ IPO डिटेल :
3 एप्रिल 2023 रोजी ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते. हा IPO गुंतवणूकदारांसाठी 6 एप्रिल 2023 पर्यंत ओपन ठेवण्यात आला होता. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 415 रुपये ते 436 रुपये प्रति शेअर ठेवली होती. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीने IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 34 शेअर्स वाटप केले आहेत. या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे.

‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ स्टॉक सबस्क्रिप्शन :
‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे IPO स्टॉक शेवटच्या दिवशी 2.34 पट सबस्क्राइब झाले होते. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO किरकोळ श्रेणीत 0.88 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार कोटा 3.77 पट आणि गैरसंस्थात्मक खरेदीदार कोटा 0.43 पट सबस्क्राईब झाला होता. हा IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशी 0.03 पट अधिक आणि दुसऱ्या दिवशी 0.10 पट सबस्क्राइब झाला होता, म्हणून शेअरची लिस्टिंग फार कमजोर झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avalon Technologies Share Price Today on 19 April 2023.

हॅशटॅग्स

Avalon Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x