3 May 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

VIDEO | ऑन रेकॉर्ड महिलेसोबत I Love You म्हणत रोमान्स, महिलेला वकिलांची फौज मिळणार समजताच शेवाळेंची दाऊद-दाऊद ओरड?

MP Rahul Shewale

MP Rahul Shewale | राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणारी महिला रिंकी बक्सला हिने राष्ट्रवादीच्या महिला नेत्या ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत व्हिडिओ LIVE करत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. त्यात तिने आणि तिच्या कुटुंबाने भोगलेल्या अडचणींचा पाढा देखील वाचला. आपल्याला प्रचंड मानसिक त्रास आणि धमक्या देण्यात आल्याचं तिने सांगितलं. अनेकदा तिला सर्व प्रकरण सांगताना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले. अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने प्रामाणिकपणे आपलेच असल्याचे मान्य देखील केले. विशेष म्हणजे आपली केस स्थानिक वकील लढवत नसल्याने आपण याविरुद्ध लढा देऊ शकत नाही असं म्हटलं आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांनी पीडित महिला रिंकी बक्सला हिला सर्व वकिलांची फौज देण्याची मदत जाहीर केलीय, तसेच वेळ पडल्यास सर्व महिला रस्त्यावर उतरू असं देखील जाहीर केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे भलतेच घाबरल्याचं पाहायला मिळतंय.

होय, कारण बराच काळ रिंकी बक्सला हिच्यासोबत ऑन व्हिडिओ रेकॉर्ड “I Love You Jaan” म्हणत तीच चुंबन घेणाऱ्या खासदार राहुल शेवाळेंना अचानक या महिलेत पाकिस्तान कनेक्शन दिसू लागलं आहे. तसेच त्याच्या आयुष्यातील या विवाहबाह्य प्रकरणात आता थेट NIA ने हस्तक्षेप करावा अशी जावईशोध करणारी मागणी त्यांनी केल्याने समाज माध्यमांवर शिंदे समर्थकांनी खिल्ली उडवणं सुरु झालं आहे आणि हे व्हिडिओ नव्याने पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत.

काय म्हणाले राहुल शेवाळे?
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. मात्र, या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणाची गंभीर माहिती दिली. सदर फॅशन डिझायनर महिलेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानातील गँगशी संबंध असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तसेच या प्रकरणाची एनआयए मार्फत चौकशाी करण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.

महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. त्यांच्या गँगमध्ये फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. राशीद नावाचा पाकिस्तानी एजंटही आहे. ही फॅशन डिझायनर महिला दाऊद गँगसोबत काम करत आहे. रईस आणि जावेद छोटाली नावाच्या व्यक्ती सोबत ती काम करते. रईस आणि छोटालीसोबत तिचे संबंध आहेत. ती दोघांना परिचित आहे. हे साधंसुधं प्रकरण नाही हा आंतरराष्ट्रीय कट आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.

ही महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेची दाऊद आणि पाकिस्तानशी लिंक आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. हे प्रकरण गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएच्या माध्यमातून करावा. त्यातून इंटरनॅशनल रॅकेटचा पर्दाफाश होईल, असा दावा शेवाळे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी पक्ष या प्रकरणाच्या पाठिशी आहे. राष्ट्रवादीचा दाऊदशी सबंध आहे. त्यांचा मंत्री दाऊदशी संबंधित असल्यामुळे तुरुंगात आहे. महिलेच्या वकिलाच्या संभाषणातही नवाब मलिक यांचा उल्लेख आहे. यावरून काय तो अर्थ काढता येतो, असं सांगतानाच शेवाळे यांनी वकिलाच्या संभाषणाची क्लिपच ऐकवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मी या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. तसेच अनिल परब यांना पोलीस स्टेशनला पाठवून माहिती करून घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp MP Rahul Shewale in trouble check details on 25 December 2022.

हॅशटॅग्स

#MP Rahul Shewale(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x