8 May 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल
x

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांची फौज स्वागतासाठी

Anil Deshmukh

Anil Deshmukh | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काहीच वेळापूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते आणि कार्यकर्ते जेलबाहेर जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलं.

अनिल देशमुखांची प्रतिक्रिया :
‘मला खोट्या आरोपात फसविण्यात आलेलं आहे. परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमबीर सिंहने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी जे अनिल देशमुखांवर आरोप केले 100 कोटींचे ते फक्त ऐकीव माहितीवर आहे. माझ्याकडेही त्याबद्दल काही पुरावा नाही.’

‘त्याच बरोबर हायकोर्टाच्या निर्णयामध्ये.. जे हायकोर्टाने निरीक्षण केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा परमबीर सिंह यांच्या अतिशय जवळचा सचिन वाझे याने जे माझ्यावर आरोप केले होते त्याबद्दल हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आपल्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की,सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. अशा गंभीर स्वरुपाच्या आरोप असलेल्या आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. आपल्याला कल्पना आहे की, सचिन वाझे याच्यावर आतापर्यंत दोन खुनाच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former Home Minister Anil Deshmukh released from jail after high court order check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Anil Deshmukh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x