4 May 2024 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Reliance Capital Share Price | हा शेअर 10 रुपयाचा, रोज 5% वाढतोय, आजही 5.54% वाढला, खरेदी करावा?

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचा भाग असलेल्या ‘रिलायन्स कॅपिटल कंपनी’ च्या शेअरमध्ये मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. अनिल अंबानींच्या मालकीची ‘रिलायन्स कॅपिटल’ ही कर्जबाजारी कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. टोरेंट ग्रुप आणि हिंदुजा ग्लोबल यांच्याकडून कंपनीचे अधिग्रहण होणार आहे, अशी बातमी सध्या बाजारात पसरली आहे. त्यामुळे हा स्टॉक ॲक्टिव झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 30 टक्के पडले आहेत. त्याच वेळी YTD आधारे शेअरची किंमत 21 टक्के वाढली आहे. सोमवारी (०९ जानेवारी २०२३) हा शेअर 5.54% वाढून 11.20 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)

शेअर किंमतीचा इतिहास :
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची किंमत काल NSE इंडेक्सवर 5 टक्के अपर सर्किटवर 10.65 रुपये किमतीला बंद झाली होती. या स्मॉल कॅप पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्सनी 2023 च्या सुरुवातीपासून सतत 5 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर धडक दिली आहे. 5 जानेवारी 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 600.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि नंतर स्टॉक मध्ये पडझड सुरू होऊन शेअर्स सध्या 10.65 रुपयांवर आला आहे. म्हणजेच या काळात ज्या लोकांनी शेअरमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 1,775 हजार रुपये झाले आहे.

रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरी प्रकरण :
टोरेंट उद्योग समूहाच्या याचिकेवर NCLT ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या दिवाळखोरीच्या कार्यवाहीला स्थगिती दिली. किंबहुना गुजरात स्थित टोरेंट उद्योग समूहाने दाखल केलेल्या याचिकेत हिंदुजा उद्योग समूहाच्या सुधारित बोलीला आव्हान दिले आहे. ई-लिलाव प्रक्रियेत टोरेंट उद्योग समूहने 8,640 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. तर हिंदुजा उद्योग समूहाने 8,110 कोटी रुपये बोली लावली होती. मात्र ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशीच लगेच हिंदुजा उद्योग समूहाने आपली ऑफर 9000 कोटी रुपये जाहीर केली. ई-लिलावानंतर हिंदुजा उद्योग समूहाने बोली वाढवली, आणि ही ऑफर चुकीची आणि बेकायदेशीर आहे, असे टोरेंट उद्योग समूहाने आपल्या दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे. NCLT ने RCL कंपनीच्या प्रशासकाला टोरेंट उद्योग ग्रुपच्या अर्जाला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात केली जाणार आहे.

आरबीआयचा निर्णय :
मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये RBI ने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासक म्हणून ‘नागेश्वर राव वाय’ यांना नियुक्त केले होते. रिलायन्स कॅपिटल कंपनी दिवाळखोरी संहिते अंतर्गत लिलावासाठी NCLT मधे जाणारी तिसरी मोठी NBFC कंपनी आहे. या आधी स्रेई ग्रुप आणि डीएचएफएल कंपनीचा ही लिलाव झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price 500111 RELCAPITAL in focus check details on 09 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x