6 May 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

TCS Recruitment 2023 | तयार राहा! सुप्रसिद्ध टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी सव्वा लाख कर्मचारी भरती करतेय

TCS Recruitment 2023

TCS Recruitment 2023 | देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) २ दिवसांपूर्वी तिमाही निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्तम राहिली असून, तिच्या निव्वळ नफ्यात १०.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत टीसीएसचा निव्वळ नफा १०,८८३ कोटी रुपये होता. मात्र आज कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत असून टीसीएसचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

नोकर भरतीसंदर्भात टीसीएसची मोठी घोषणा
कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये 1.25 लाखांहून अधिक लोकांना नोकरी देणार असल्याची मोठी घोषणा कंपनीने केली आहे. आयटी क्षेत्रातील भरतीबाबतची ही मोठी घोषणा असून त्याचा फायदा कंपनीला नक्कीच होईल, अशी अपेक्षा आहे. यासंबंधित माहिती आणि तारखा तसेच पदाचे नाव यासंबंधित माहिती कंपनी वेबसाईटवर दिली जाणार आहे. यामध्ये फ्रेशर्सना सुद्धा मोठी संधी दिली जाणार आहे.

टीसीएसची कर्मचारी संख्या अलीकडे कमी झाली आहे
सॉफ्टवेअर कंपनीची कर्मचारी संख्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत २,१९७ ने घटून ६.१३ लाखांवर आली आहे. डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली असली तरी टीसीएसने २०२३-२४ या आर्थिक वर्षात १.२५ लाखांहून अधिक लोकांना कामावर घेणार असल्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 1.03 लाख नवीन लोकांना रोजगार दिला आणि ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 2,197 लोकांची कपात होऊनही टीसीएसने आर्थिक वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत निव्वळ आधारावर सुमारे 55,000 लोकांची भरती केली आहे.

काय म्हणाले कंपनीचे सीईओ
कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले की, “जर तुम्ही आमच्या एकूण नोकरभरतीचा ट्रेंड पाहिलात, तर आम्ही जवळपास त्याच पातळीवर कामावर घेत आहोत. पुढील आर्थिक वर्षात आपण १,२५,००० ते १,५०,००० लोकांची भरती करावी,’ असे कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी (सीएम एचआर) मिलिंद लक्कड यांनी सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: TCS Recruitment 2023 for 125000 vacancy check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#TCS Recruitment 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x