14 December 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Quick Money Share | होय होय! फक्त 15 दिवसांत या शेअरने गुंतवणुकीचा पैसा तिप्पट केला, तुम्ही संधीचा फायदा घेणार?

Quick Money Share

Quick Money Share | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र एक शेअर असा आहे, जो मागील काही काळापासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. या शेअरचे नाव आहे, ‘एसबीईसी शुगर’. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसबीईसी शुगर कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 77.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज हा स्टॉक सकाळी 81.75 रुपये किमतीवर ओपन झाला आहे. 15 ट्रेडिंग दिवसांपूर्वी या कंपनीचे शेअर 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात जर तुम्ही मोदी उद्योग समूहाच्या या शुगर शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर त्याला आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.38 लाख रुपये झाले असते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)

स्टॉक वाढीचे कारण गुलदस्त्यात :
स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने एसबीईसी शुगर कंपनीला स्टॉक मधील अचानक वाढीचे कारण विचारले असते, कंपनीने आपल्याला काही माहीत नाही, असे उत्तर दिले. कंपनीने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, सध्या आमच्याकडे स्टॉक मधील अचानक तेजीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र कंपनीने असे कोणतेही कृत्य केलेले नाही, ज्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीवर परिणाम होईल. अशी माहिती कंपनीने सेबीला दिली आहे.

शेअर मध्ये वार्षिक 234.33 टक्के वाढ :
SBEC शुगर कंपनीचे शेअर्स YTD आधारावर 2022 या वर्षात 234.33 टक्के मजबूत झाले आहेत. त्याच वेळी मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 938 टक्क्यांची वाढ झाली आहे. 11 डिसेंबर 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 7.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 21 डिसेंबर 2022 रोजी SBEC शुगर कंपनीचे शेअर्स 77.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर 11 डिसेंबर 2020 रोजी तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुम्हाला 10.38 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBEC Sugar Company has given huge Return to shareholders check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x