29 April 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

लोकसभा निवडणुकीदरम्यानचा मनसेचा कार्यक्रम असा असेल?

MNS, NCP, Loksabha Election, Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि विधानसभेच्या कामाला लागा असा संदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही दिवसांपूर्वी दिला. मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसली तरी यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षा विरोधी प्रचार करण्याची पक्ष एक गेमप्लॅन तयार करत आहे असं प्रथम दर्शनी दिसतं. स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘यंदाची लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध देश’ असल्याचे थेट मत प्रदर्शन करत, कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम आखून देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी लोकसभा निवडणूकीत मनसे लढवत नसली तरी, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचं ध्येय निश्चित करून त्यासाठी कार्यकर्त्यांनी नक्की काय काम करायचं आहे ते निश्चित केलं आहे. मनसेच्या या गेमप्लॅनविषयी अनिल शिदोरे यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहीलेली एक पोस्ट बराच काही सांगून जात आहे.

२१ तारखेच्या या फेसबुक पोस्टवर अनिल शिदोरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र सैनिकांना परवा स्पष्ट राजकीय कार्यक्रम मिळाला आहे. आपल्याला मोदी आणि शहा यांना हरवायचं आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात जी जी माहिती मिळेल ती ती जमा करा. अनेक बाबतीत गेल्या सरकारचं अपयश आहे. ते लोकांसमोर मांडा… त्यासाठी स्वत: इंटरनेटवर जाऊन खात्री करून घ्या. अभ्यास करा. त्या गोष्टी फार व्यापक प्रमाणात समाजात पसरवा. तुमच्या मित्रांना तर सांगाच पण त्याही पलीकडे जा. ज्यांनी मागच्या निवडणुकीला मोदींना मतदान केलं होतं ते लोक कोण आहेत ते पहा. त्यांच्याशी बोला. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी माहितीचा वापर करा. अटोकाट प्रयत्न करा.. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आहेच पण त्यांचे अल्गॉरिदम्स किंवा त्यांची रचना अशी असते की ते संदेश तुमच्या तुमच्यातच फिरत रहातात.

तुमच्याच राजकीय विचारांच्या माणसांना, जे तुमच्या बाजूचे आहेत, तुम्ही तेच तेच सांगत रहाता. त्याचा उपयोग नाही. त्या वर्तुळाच्या पुढे जा… मी तर म्हणेन की रोज किमान तीन लोकांना भेटा, ज्यांनी मागच्या निवडणुकीत मोदींना मत दिलं आहे अशा व्यक्तिंना प्रत्यक्ष भेटा. नुसता व्हॉट्सअ‍ॅप नको, फेसबुक संदेश नको. प्रत्यक्ष भेटा.. जे थोडे वेगळा विचार ऐकू शकतात, चर्चा करू शकतात. त्यांना तुमचा राजकीय विचार पटवून द्या… आपण आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. परंतु आपल्याला निवडणुकीत कुणाला हरवायचं आहे हे माहीत आहे.. ते आपलं लक्ष्य आहे.. भारतात हे कदाचित पहिल्यांदा झालं असावं की, एखाद्या पक्षाचा कुणीच उमेदवार नाही परंतु त्या पक्षाला स्वत:चं एक राजकीय ध्येय आहे.. लक्षात ठेवा माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनो, ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची आहे.. जय महाराष्ट्र !

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x