4 May 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
x

एनसीपी-काँग्रेसचे उमेदवार भाजपने पळवले, अन फडणवीस म्हणतात आघाडीला उमेदवार मिळेना?

Shivsena, BJP, bjp maharashtra, uddhav thackeray, devendra fadnavis, kolhapur

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी अंबाबाईचं एकत्रित दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निवडणूक लढायला तयार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी टीकेची तोफ डागली. तर शिवसेना-भाजपा युती म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तुटणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी राज्याच्या जनतेला दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला उमेदवार मिळत नाहीत. कॅप्टननेही माढ्यातून माघार घेतली आहे. जे कॅप्टन आधी ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते, ते आता नॉन प्लेयिंग कॅप्टन बारावा गडी म्हणून काम करत आहेत. आघाडीचे उमेदवार तिकीटं परत करत आहेत. रोज त्यांची तिकीटं बदलली जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जगभरामध्ये फक्त पाकिस्तान, काँग्रेस आणि त्यांचे कच्चे-बच्चे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात. फक्त नावात राष्ट्रवादी असून चालत नाही तर मनात राष्ट्रवाद असावा लागतो, असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x