28 April 2024 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण?

Star Health & Allied Insurance Share Price

Star Health & Allied Insurance Share Price | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमधील विमा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘स्टार हेल्थ’ कंपनीचे शेअर्स काही दिवसांपूर्वी वार्षिक नीचांक किंमत पातळीवर घसरले होते. त्यानंतर स्टॉक मध्ये थोडी सुधारणा झाली, आणि शेअरची किंमत अवघ्या चार दिवसांत 15 टक्क्यांनी वाढली. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 1.69 टक्के घसरणीसह 508.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Health & Allied Insurance Share Price | Star Health & Allied Insurance  Stock Price | BSE 543412 | NSE STARHEALTH)

भारतीय ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या अहवालात स्टार हेल्थ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचे तिमाही निकाल उत्कृष्ट आले आहेत, त्यामुळे अनेक तज्ज्ञ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पुढील काळात या शेअरची 54 टक्के वाढू शकते. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्टार हेल्थ कंपनीचे 1,78,70,977 शेअर्स सामील आहेत, जे कंपनीच्या भाग भांडवलाच्या 3.1 टक्के आहेत.

स्टार हेल्थ कंपनीचे डिसेंबर 2022 मधील आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. कंपनीचे NEP मूल्य वर्षभरात 15 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे तोट्याचे प्रमाण कमी होऊन 63.7 टक्क्यांवर आले आहेत. हे प्रमाण जितके कमी होत जाईल, तितका जास्त फायदा विमा कंपनीला होईल. स्टार हेल्थ ही भारतातील सर्वात मोठी स्टैंडअलोन हेल्थ इन्शुरन्स कंपनी असून एप्रिल ते डिसेंबर 2022 या पहिल्या नऊ महिन्यात कंपनीच्या ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम इन्कम 33 टक्केवर आला आहे.

भारतीय ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने आर्थिक वर्ष 2022-23 ते 2025 मध्ये स्टार हेल्थ कंपनीचा वार्षिक कमाईचा अंदाज वाढवला आहे. पुढील काळात या कंपनीचा निव्वळ नफा 26 टक्के आणि महसूल 2023-25 पर्यंत 21 टक्के चक्रवाढ वार्षिक दराने वाढेल. त्यामुळे ब्रोकरेज फर्मने स्टार हेल्थ कंपनीचे शेअर्स 795 रुपये लक्ष किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर्स 35 टक्के स्वस्तात उपलब्ध :
मागील वर्षी 11 फेब्रुवारी 2022 रोजी ‘स्टार हेल्थ’ कंपनीचे शेअर्स 798 रुपये या आपल्या वार्षिक विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तथापि स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव आला आणि अवघ्या एका वर्षात शेअरची किंमत 43 टक्क्यांनी घसरली. 30 जानेवारी 2023 रोजी स्टार हेल्थ कंपनीचे शेअर्स 451.10 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. त्यानंतर शेअरमध्ये खरेदी पुन्हा वाढली आणि स्टॉकमध्ये 15 टक्के सुधारणा झाली. सध्या शेअरची किंमत अजूनही आपल्या वार्षिक उच्चांकावरून 35 टक्के स्वस्तात ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Star Health & Allied Insurance Share Price 543412 STARHEALTH stock market live on 03 February 2023.

हॅशटॅग्स

#Jhunjhunwala Portfolio(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x