12 May 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर 70 टक्के खाली घसरले, स्टॉक पडझडीचे कारण? अजून खरेदी करावे की होल्ड करावे?

TTML share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीने आपल्या शेअर धारकांना निराश केले आहे. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ स्टॉक BSE इंडेक्सवर सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आला आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर टीटीएमएल कंपनीचे 2.45 टक्के घसरणीसह 67.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत स्टॉकची किंमत 9.81 टक्के घटली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

TTML शेअर तपशील :
YTD आधारे टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 25 टक्के तुटले आहेत. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 60 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. या दरम्यान शेअरची किंमत 171 रुपयांवरून 67.55 रुपयांवर आली आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टीटीएमएल शेअर 210 रुपयांवर ट्रेड करत होता. या कालावधीत, टीटीएमएल कंपनीचे शेअर्स जवळपास 67 टक्के पडले आहेत. 13 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल स्टॉकने 262.70 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्या तुलनेत हा स्टॉक आतापर्यंत 73 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 262.70 रुपये ही टीटीएमएल शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत होती.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
टीटीएमएल कंपनी कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन सोल्यूशन्स संबंधीत सेवा प्रदान करणारी मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस या ब्रँड नावाखाली टीटीएमएल कंपनी भारततीय व्यवसायांना कनेक्टिव्हिटी, सहयोग, क्लाउड, सुरक्षा, IoT आणि विपणन सेवा प्रदान करण्याचे काम करते.

कंपनीची पुढील योजना :
नुकताच टीटीएमएल कंपनीने WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मसह आपल्या क्लाउड कम्युनिकेशन सूट स्मार्टफ्लोच्या धोरणात्मक विस्ताराची योजना जाहीर केली होती. टीटीएमएल कंपनीला सप्टेंबर 2022 या तिमाहीत 287.49 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत टीटीएमएल कंपनीची विक्री 3.3 टक्के वाढीसह 277.66 कोटी रुपयेवर पोहचली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 10 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या