जम्मू-कश्मीर : भारताविरुद्ध पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापती काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जम्मू-कश्मीरच्या पुंछ भागात शाहपुर सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला आहे. या गोळीबारात पाच नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानी सैन्याच्या ७ चौक्या उद्धवस्त केल्या आहेत.
