15 December 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

लॉकडाउन काळात सर्वाधिक मदतीला धावला महाराष्ट्र सैनिक | पण सर्व्हेमध्ये हे लोक प्रतिनिधी

GovernEye, citizen engagement platform, lockdown research

नवी दिल्ली, २३ डिसेंबर: लॉकडाउन दरम्यानचा म्हणजे कोरोना सर्वाधिक उच्चांकावर असताना सामान्य माणूस प्रचंड हतबल आणि त्रासलेला पाहायला मिळाला होता. कोरोना बाबतीत अनेक गैरसमज देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्याने कोणीही कोणाच्या मदतीला जाण्यास कचरत होते. एखाद्या घरात कोरोना पेशंट असेल तर त्यांना अक्षरशः वाळीत टाकावं असे उद्योग सुरु झाले होते.

याच काळात महाराष्ट्रात तरी सामान्य लोकांच्या मदतीला सर्वाधिक कोणता पक्ष धावून गेला असेल तर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पत्रकार देखील नाकारणार नाहीत. इस्पितळ, कोविड किट, रक्तदान शिबीर, शक्य ती आर्थिक मदत, इस्पितळातील भरमसाट बिलाबाबतचे प्रश्न, सरकारने जाहीर केलेली प्राथमिक औषध अशा सर्वच विषयात महाराष्ट्र सैनिक सर्वात पुढे दिसले. त्यात अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःचे जीव आणि आरोग्य धोक्यात घालून अडचणीत सापडलेल्या सामान्य लोकांची मदत केल्याचे सर्वानी पहिले आहे. त्यावेळी जमिनीवरील वास्तवाशी दोन हात करताना दिसले ते महाराष्ट्र सैनिक हे सांगायला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. मात्र देशात नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणात लॉकडाउन काळात सामान्य लोकांना मदत करणाऱ्या लोकांच्या मदतीला धावलेल्या लोक प्रतिनिधींची नावं समोर आली आहेत ती पाहिल्यावर हसावं की रडावं असा प्रश्न निर्माण होईल.

नवी दिल्लीतील सिटीझन एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नेमकी कोणत्या प्रकारची मदत या खासदारांनी सामान्य लोकांना केली त्यावर कोणताही भाष्य नाही. १ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी लोकसभेतील २५ खासदारांची निवड झाली होती. या सर्वेक्षणासाठी मिळालेल्या अर्जांच्या आधारावर ही अंतिम २५ नाव निश्चित करण्यात आली होती. यातून प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्रायातून सर्वाधिक मदत केलेल्या ‘टॉप-१०’ खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे.

टॉप-१० यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. नागपुरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे या दोन खासदारांनी राज्यात लॉकडाऊन काळात सर्वाधिक मदत केल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

त्यातील महत्वाची नावं अनिल फिरोजिया (भाजप), अडाला प्रभाकर रेड्डी (वायएसआरसीपी), राहुल गांधी (काँग्रेस), ), महुआ मोइत्रा (टीएमसी), एल.एस.तेजस्वी सूर्या (भाजप), हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना), सुखबीर सिंग बाद (एसएडी), शंकर लालवानी (भाजप), डॉ. टी. सुमाती थमीझाची थांगापांडियन (डीएमके) आणि नितीन गडकरी (भाजप), महुआ मोइत्रा (टीएमसी), एल.एस.तेजस्वी सूर्या (भाजप), हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना), सुखबीर सिंग बाद (एसएडी), शंकर लालवानी (भाजप), डॉ. टी. सुमाती थमीझाची थांगापांडियन (डीएमके) आणि नितीन गडकरी (भाजप).

 

News English Summary: The survey, conducted by GovernEye, a citizen engagement platform in New Delhi, did not comment on what kind of help the MPs provided to the general public. The survey, which started on October 1, had selected 25 MPs from the Lok Sabha. The final 25 names were decided on the basis of applications received for the survey. From this, a list of ‘Top 10’ MPs who have helped the most from the interviews and feedback of the citizens conducted in the actual constituency has been prepared.

News English Title: GovernEye citizen engagement platform Top 10 MPs who have helped peoples the most news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x