14 December 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

देशभरात एकाच दिवसात आढळले ५६,२८२ नवे कोरोना रुग्ण

India, Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे. आज सलग आठव्या दिवशी ५० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात तब्बल २६ हजार २८२ नवीन रुग्ण सापडले तर, ९०४ जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ६४ हजार ५३७ झाली आहे. तर मृतांचा आकडा हा ४० हजार ६९९ झाला आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, संध्या देशात 5 लाख 95 हजार 501 सक्रीय रुग्ण आहेत. तर 13 लाख 28 हजार 337 रुग्ण निरोगी झाले आहेत. हा दिलासादायक बाब असली तरी, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त प्रभावी देश आहेत. या देशांमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 1 लाख 60 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र (४,६८,२६५), तामिळनाडू (२,७३०००), आंध्र प्रदेश (१,७६,३३३), कर्नाटक (१,५००००) आणि दिल्ली (१,४०,२३२) या पाच राज्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. करोनामधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार आतापर्यत १२ लाख ८२ हजार २१५ जणा करोनामुक्त झाले आहेत.

 

News English Summary: The number of corona sufferers in the country does not seem to be declining. Today, for the eighth day in a row, more than 50,000 corona patients were registered. In the last 24 hours, 26,282 new patients were found and 904 died.

News English Title: India Records Biggest Single Day Spike Of 56282 Cases News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x