9 May 2025 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Paytm Share Price | कमाईची संधी! स्वस्त झालेल्या पेटीएम शेअरवर 32 टक्के परतावा मिळू शकतो, नवी टार्गेट प्राईस पहा

Paytm Share Price

Paytm Share Price | डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘पेटीएम’ ची मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ च्या शेअरमध्ये आज किंचित घसरण पहायला मिळाली आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के घसरणीसह 640.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये सुमारे 16 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. डिसेंबर 2022 तिमाहीच्या निकालांमुळे गुंतवणूक आणि संशोधन संस्था ‘मॅक्वेरी रिसर्च’ पेटीएम कंपनीच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली, आणि त्यावर 850 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 32 टक्के अधिक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

पेटीएमचे रेटिंग अपग्रेड :
‘मॅक्वेरी रिसर्च’ फर्मने पेटीएम कंपनीचे रेटिंग दोन वेळा अपग्रेड केले. काही दिवसांपूर्वी चीनी कंपनी अलीबाबाने पेटीएममधील आपले संपूर्ण 3.4 टक्के भाग भांडवल ब्लॉक डीलद्वारे विकण्याचा निर्णय घेतला. या ब्लॉक डीलची माहिती मिळताच 10 फेब्रुवारी 2023 रोजी पेटीएमच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्री झाली. दुसऱ्या दिवशी स्टॉकमध्ये किंचित वाढ दिसून आली मात्र आज पुन्हा शेअर लाल निशाणीवर क्लोज झाला आहे.

पेटीएमची कामगिरी :
पेटीएम कंपनीने सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत सकारात्मक ऑपरेटिंग प्रॉफिट मिळवण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. ऑक्टोबर- डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने हे लक्ष गाठले. पेटीएमची मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ चा महसूल वार्षिक 41 टक्क्यांच्या वाढीसह 2062 कोटी रुपये झाला आहे. त्याच कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा 778 कोटी रुपयांवरून 392 कोटी रुपये झाला आहे. याचा अर्थ कंपनीचा तोटा घटला आहे. या कारणांमुळे मॅक्वेरी रिसर्च फर्मने कंपनीचे रेटिंग अंडरपरफॉर्मवरून अपग्रेड करून आउटपरफॉर्मवर असे केले आहे. याशिवाय रिसर्च फर्मने स्टॉकवर 800 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 stock market live today as on 16 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या