3 May 2024 5:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

EKI Energy Share Price | बापरे! तब्बल 2066 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर 44% स्वस्त झाला, खरेदी करावा?

EKI Energy Share Price

EKI Energy Share Price | आज शेअर बाजारात बरीच उलढाल पाहायला मिळाली. कमजोर तिमाही निकालामुळे तेजीमुळे अनेक शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीच्या स्टॉकबाबतही असेच काहीसे घडले आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के लोअर सर्किटसह 632.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. एका आठवड्यात या कंपनीचे शेअरस तब्बल 44.66 टक्के खाली आले आहेत. आज देखील स्टॉक 10 टक्के पडला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | EKI Energy Services Share Price | EKI Energy Services Stock Price | BSE 543284)

घसरणीचे कारण :
‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफा 76.3 टक्के घसरून 38.09 कोटी रुपयेवर आला आहे. त्याच वेळी कंपनीच्या महसूलात 40.9 टक्के घसरण झाली आहे. कंपनीचा EBITDA जवळपास 78 टक्के घसरून 46.9 कोटी रुपयेवर आला आहे. कंपनीच्या एकूण खर्चात 24.2 टक्के घट झाली आहे. तिमाही निकाल पाहून कंपनीचे ऑडिटर ‘वॉकर चंडिओक अँड कंपनी’ यांनी चिंता व्यक्त केली, आणि स्टॉक रॉकेटसारखा उलट्या दिशेने क्रॅश झाला आहे.

‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीचे अध्यक्ष आणि MD मनीष डबकारा यांनी स्पष्टीकरण दिली की, “आम्ही आर्थिक बाबींचे निरीक्षण आणि नवीन संधींचे मूल्यांकन करत आहोत. आम्हाला खात्री आहे की कार्बन मार्केट जागतिक पातळीवर हळूहळू वाढेल आणि आमचे गुंतवणूकदार, भागधारक, कर्मचारी आणि ग्राहक यांच्या मदतीने ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस कंपनी बाजारातील मोठा हिस्सा काबीज करेल”.

मल्टीबॅगर परतावा :
‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ शेअरने सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2021 मध्ये स्टॉक लिस्टिंग झाल्यावर सहा महिन्यांत स्टॉकमध्ये 90 पट वाढ पाहायला मिळाली होती. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के लोअर सर्किटसह 632.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 6 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 2964 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचा IPO 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ची किंमत बँड प्रति शेअर 100 ते 102 रुपये निश्चित करण्यात आली होती. हा स्टॉक बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीच्या तुलनेत 37 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ही कंपनी मुख्यतः क्लायमेट चेंज अॅडव्हायझरी, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिझनेस एक्सलन्स अॅडव्हायझरी, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट या सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EKI Energy Services Share Price 543284 stock market live on 15 February 2023.

हॅशटॅग्स

#EKI Energy Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x