
SBI FD Interest Hike | भारतीय रिझर्व्ह बँकेने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात ०.२५ टक्के वाढ जाहीर केली होती. रेपो दरात वाढ झाल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकठेवींवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने २ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याज वाढवले आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयचे एफडीवरील सुधारित दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारीरोजी आरबीआयने पुन्हा एकदा रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. रेपो दरात ही सलग सहावी वाढ आहे. पतधोरणाच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जगभरातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाचे व्याजदर वाढविणे आवश्यक झाले आहे. मात्र यावेळी रेपो दरात केवळ ०.२५ टक्के वाढ करण्यात येत आहे.
एसबीआयचे नवे एफडी दर काय आहेत?
* ७ दिवस ते ४५ दिवस – ३ टक्के
* ४६ दिवस ते १७९ दिवस – ४.५ टक्के
* १८० दिवस ते २१० दिवस – ५.२५ टक्के
* 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी – 5.75 टक्के
* 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी – 6.80 टक्के
* 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी – 7.00%
* 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी – 6.50 टक्के
* ५ वर्षे आणि १० वर्षे – ६.५० टक्के
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.