20 May 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

Torrent Power Share Price | या कंपनीच्या तिमाही नफ्यात 88% वाढ, मोठा डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड तारखेची नोंद घ्या

Torrent Power Share Price

Torrent Power Share Price | टॉरेंट ग्रुपचा भाग असलेल्या ‘टोरेंट पॉवर’ कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 88 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 694.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत कंपनीने 369.45 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने आपल्या तिमाही निकालांसह शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Torrent Power Share Price | Torrent Power Stock Price | BSE 532779 | NSE TORNTPOWER)

टोरेंट पॉवर लाभांश रेकॉर्ड तारीख :
‘टोरेंट पॉवर’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 22 रुपये लाभांश वाटप करणार आहे. टोरेंट पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांशाची पात्रता निश्चित करण्यासाठी शुक्रवार 22 फेब्रुवारी 2022 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनी 9 मार्च 2023 रोजी किंवा नंतर आपल्या पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

कंपनीची कामगिरी :
बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर कंपनीचे शेअर्स 10.28 टक्के वाढीसह 504.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 4.20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी यात पैसे लावले होते, त्यांना आता 21 टक्के नुकसान सहन करावे लागले आहे.

स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला पाठवलेल्या महितीत कंपनीने म्हंटले आहे की, कंपनीचे एकूण उत्पन्न या तिमाहीत वाढून 6,526.44 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 3,833.14 कोटी रुपये महसूल संकलन केले होते. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च वाढून 5,549.01 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीचा खर्च 3,324.02 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Torrent Power Share Price 532779 TORNTPOWER on 15 February 2023.

हॅशटॅग्स

Torrent Power Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x