
Axita Cotton Share Price | ‘एक्झिटा कॉटन’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या स्मॉलकॅप कंपनीने मागील 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 3000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 55 रुपयांवर पोहचले आहेत. ‘एक्झिटा कॉटन’ या कंपनीत परकीय गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक वाढवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Axita Cotton Share Price | Axita Cotton Stock Price | BSE 542285 | NSE AXITA)
9 जुलै 2021 रोजी BSE इंडेक्सवर ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीचे शेअर्स 1.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 31 लाखांहून जास्त झाले आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कापड कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 58.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 3080 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 9 जुलै 2021 रोजी ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 31.87 लाख रुपये झाले असते.
परकीय गुंतवणूकदारांची वाढती गुंतवणूक :
परकीय गुंतवणूकदार ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीमध्ये आपली गुंतवणुक वाढवत आहेत. मार्च 2022 च्या तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये 6.04 टक्के गुंतवणूक वाढवली आहे. जून 2022 च्या तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांचा वाटा वाढून 10.02 टक्केवर पोहचला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीमधील परकीय गुंतवणूकदारांचा एकूण वाटा 10.61 टक्केवर पोहचला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कापड कंपनीतील परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 11.63 टक्के झाला आहे. ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69.60 रुपये होती. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.08 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.