7 May 2025 2:57 PM
अँप डाउनलोड

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात घट

RBI, Reserve Bank of India

मुंबई : रिझर्व्ह बँकेनं गृहकर्ज घेणाऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने आज रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आले आहेत. २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत या निर्णय घेण्यात आला.

समितीच्या ६ पैकी ५ सदस्यांनी कपातीचं समर्थन केलं. परिणामी आगामी काळात गृह, वाहन किंवा अन्य कर्जे स्वस्त होणार असून ज्यांनी गृहकर्ज घेतलंय त्यांच्या ईएमआयमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या