1 May 2025 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Macfos IPO | या SME कंपनीचे शेअर्स प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध होणार, गुंतवणुकदारांना मिळणार मजबूत लिस्टिंग प्रॉफिट?

Macfos IPO

Macfos IPO | ‘मॅकफॉस लिमिटेड’ या ई कॉमर्स कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ‘मॅकफॉस’ कंपनीचा आयपीओ सुमारे 194 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचा IPO 17 फेब्रुवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 268.45 पट अशी सबस्क्राइब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 659.99 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.60 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, आणि शेअर्स ग्रे मार्केटमध्ये उच्च प्रीमियम किमतीवर पोहचला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)

ग्रे मार्केट प्रीमियम 82 रुपयांवर :
ग्रे मार्केटचा मागोवा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 82 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 96 ते 102 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. जर कंपनीचे शेअर्स 102 रुपये प्राइस बँडवर वाटप केले गेले आणि ग्रे मार्केट प्रीमियम 82 रुपयांवर टिकुन राहिला तर मॅकफॉस कंपनीचे शेअर्स 184 रुपये किमतीचावर सूचीबद्ध होऊ शकतात. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1 मार्च 2023 रोजी बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

शेअर्सचे वाटप 24 फेब्रुवारीपर्यंत :
‘मॅकफॉस लिमीटेड’ कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत होईल, आणि 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅटमध्ये शेअर्स येतील. मॅकफॉस कंपनीच्या IPO चा आकार 24 कोटी रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदार IPO मध्ये फक्त 1 लॉटवर पैसे लावू शकतात. 1 लॉटमध्ये एकूण 1200 शेअर्स वाटप करण्यात येतील आणि त्यासाठी गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी 122,400 रुपये गुंतवावे लागतील. मॅकफॉस लिमिटेड ही एक ई कॉमर्स कंपनी असून ती आपल्या वेबसाइट आणि मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे 12000 हून अधिक इलेक्ट्रॉनिक घटकांचे विपणन आणि विक्री करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Macfos IPO is ready for subscription check details on 23 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Macfos IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या