29 April 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Oil India Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतेय, स्टॉकची कामगिरी पाहून पैसे लावा

Oil India Share Price

Oil India Share Price | बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी 10 पेक्षा जास्त कंपन्याचे स्टॉक एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. यामध्ये एक सरकारी कंपनी देखील सामील आहे. तिचे नाव आहे, ‘ऑइल इंडिया’. या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. ऑइल इंडिया कंपनीने 10 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 245.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Oil India Share Price | Oil India Stock Price | BSE 533106 | NSE OIL)

प्रति शेअर लाभांश प्रमाण :
‘ऑइल इंडिया’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 10 रुपये लाभांश म्हणजेच 100 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील होते, त्यांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश कंपनी देईल. याआधी ‘ऑइल इंडिया’ कंपनीने 4.50 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ऑईल इंडिया कंपनीने आपल्या शेअर धारकांना 14.50 रुपये लाभांश वाटप केला आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
डिसेंबर 2022 तिमाहीत ऑईल इंडिया कंपनीचे 10712.11 कोटी रुपये कमाई केली होती, जी मागील तिमाहीच्या तुलनेत 24.58 टक्के जास्त आहे. तर मागीलआर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीची कमाई 31.23 टक्के जास्त नोंदवली गेली आहे. तिसऱ्या तिमाहीत ऑइल इंडिया कंपनीने 2799.95 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.

अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील काळात हा स्टॉक 300 रुपये किंमत पातळीपर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेज हाऊसने ऑईल इंडिया कंपनीचे शेअर्स बाय टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 245.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Oil India Share Price 533106 OIL stock market live on 23 February 2023.

हॅशटॅग्स

Oil India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x