29 April 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Onion Rates in Maharashtra | हे फक्त जाहिरातबाज शिंदे सरकार! 500 किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त 2 रुपये नफा

Onion Rates in Maharashtra

Onion Rates in Maharashtra | महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांद्याचे भाव घसरल्याने प्रचंड अस्वस्थ आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ५८ वर्षीय कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र तुकाराम चौहान यांनी सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा विक्रीसाठी ७० किलोमीटर पायपीट केली. ५१२ किलो कांदा विकल्यानंतर त्यांना प्रतिकिलो एक रुपये दर मिळाला. केवळ वाहतूक, मंडई आणि लोडिंग-अनलोडिंगचा खर्च काढला तर ५१२ किलो कांदा विकून २.४९ रुपयांचा नफा कमावला आहे. कांद्याची लागवड करणारे तुकाराम म्हणाले, ‘५१२ किलो कांदा विक्रीसाठी मला प्रतिकिलो एक रुपया दर मिळाला आहे. एपीएमसीमध्ये कांदा विक्रीचा खर्च कमी करून मी या कांद्यातून २.४९ रुपयांची बचत केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचंड रोष वाढल्याचं चित्रं आहे.

महाराष्ट्र आणि इतर सर्व कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याचे भरघोस पीक आल्याने घाऊक भावात घसरण झाली आहे. राज्यभरात चव्हाणांसारखे अनेक शेतकरी आहेत ज्याचा कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये. देशातील सर्वात मोठी कांदा मंडई असलेल्या नाशिकच्या लासलगाव एपीएमसीमध्ये घाऊक कांद्याचे भाव गेल्या दोन महिन्यांत जवळपास 70 टक्क्यांनी घसरले आहेत.

उत्पादन वाढल्याने किंमतीत घसरण
शेतकऱ्यांना प्रचलित दराने उत्पादन विकण्याशिवाय पर्याय नाही कारण उशीरा खरीप कांद्याचे शेल्फ लाइफ जेमतेम एक महिना आहे. त्यानंतर उत्पादन कुजण्यास सुरुवात होते. सर्वच शेतकरी आपली पिके बाजारात आणत असल्याने बाजारात किंमती प्रचंड घसरल्या आहेत. लासलगाव बाजारात डिसेंबरमध्ये दिवसाला 15000 क्विंटल कांद्याची आवक होत होती, ती आता दुपटीने वाढून 30000 क्विंटल झाली आहे. लासलगाव येथील सरासरी घाऊक कांद्याचे भाव 26 डिसेंबर 2022 रोजी प्रति क्विंटल 1850 रुपयांवरून 23 फेब्रुवारी 2023 रोजी 550 रुपये प्रति क्विंटलवर घसरले.

सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे – सचिन देवरे
परदेशातून कांद्याची मागणी कमी झाल्याने निर्यात मंदावली आहे. तसेच देशांतर्गत कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने महाराष्ट्रात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. या अनिश्चिततेच्या बाजारात शेतकऱ्यांना संकटातून काढण्यासाठी सरकारने त्यांना अनुदान द्यायला हवे. कारण शेतकरी जगला तर व्यापारी जगू शकतात”. असे उमराणे (नाशिक) येथील गुरूदत्त ट्रेडिंग कंपनीचे संचालक सचिन देवरे यांनी सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Onion Rates in Maharashtra check details on 24 February 2023.

हॅशटॅग्स

#Onion Rates in Maharashtra(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x