7 May 2025 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही? अमेरिकन मासिक 'फॉरेन पॉलिसी'

Narendra Modi, F16 Fighter Jet, Pakistan, Indian Air Force

वॉशिंग्टन : पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व एफ-16 हे अमेरिकन लढाऊ विमानं सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्याच एका प्रसिद्ध मासिकानं केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचं एफ-16 पाडल्याचा भारताचा दावा चुकीचा असू शकतो, असं ‘फॉरेन पॉलिसी’ या मासिकानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मासिकानं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या २ उच्च अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन वृत्त दिल्याचं मासिकानं स्पष्ट केलं आहे.

पाकिस्ताननं अमेरिकेकडून एफ-16 ही अत्याधुनिक लढवू विमानं खरेदी केली होती. विशेष अमेरिकेने त्यांना जेवढी विमान पुरवली होती त्या विमानांची मोजदाद केली असून ती योग्यच असल्याचं २ अधिकाऱ्यांनी मासिकाला सांगितलं. एक एफ-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा विचारात घेतल्यास पाकिस्तानच्या ताफ्यात एक विमान कमी असायला हवं होतं. परंतु तसं झालेलं नाही, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरला.

दरम्यान २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये आकाशात चकमक झाली. या दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-२१ मधून पाकिस्तानच्या एफ-16 वर निशाणा साधला. अभिनंदन यांच्या अचूक निशाण्यामुळे एफ-16 विमान कोसळलं ही माहिती देखील हवाई दलाने स्वतः दिली होती. त्यानंतर क्षेपणास्त्राचे अवशेष देखील प्रसार माध्यमांना दाखवले. पण तसं असलं तरी भारतीय हवाईदलाने दाखवलेले अवशेष हे क्षेपणास्त्राचे होते, एफ-१६ विमानाचे नाही. भारताच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या ताफ्यातील केवळ एफ-16 विमानच आमरार क्षेपणास्त्र डागू शकतं. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 चा वापर केला हे सिद्धत होतं, असा दावा त्यावेळी भारतीय हवाई दलानं केला होता. परंतु दुसऱ्या दाव्यानुसार म्हणजे अभिनंदन यांच्या अचूक निशाण्यामुळे एफ-16 विमान कोसळलं ही माहिती खरी असती तर अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलल्या एकूण विमानांपैकी एक एफ-१६ त्यांना कमी असल्याचं आढळलं असतं, पण अमेरिकन अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत त्यांना सर्व एफ-१६ लढाऊ विमानं पुरविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आढळून आली आहेत. त्यामुळे भारताची पुन्हा आंतरराषट्रीय प्रसार माध्यमांकडून मोठी अडचण होताना दिसत आहे.

सविस्तर अधिकृत माहिती फॉरेन पॉलिसीवर वाचा!

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या