19 January 2022 12:31 AM
अँप डाउनलोड

VIDEO: चौकीदार व मेहुल चोक्सी एकाठिकाणी एकत्र होते हे राजनाथ सिंह यांना माहित नसावे?

Narendra Modi, BJP, Mehul Choksi, Nirav Modi

बुलंदशहर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी युपी’तील बुलंदशहर येथे भाषणामध्ये काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात काँग्रेसचं सरकार असेपर्यंत नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चोक्सी देशातून पळाले नाहीत. परंतु, त्यांना जेव्हा माहीत पडलं काँग्रेस सत्तेतून गेलं आणि सतर्क चौकीदाराचं सरकार देशात आलं तेव्हा त्यांनी भारत सोडून विदेशात पलायन केलं असा आरोप सिंह यांनी केला.

बॅंकाचे कर्जबुडीत ठेऊन नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चोक्सी हे देशातून पळून गेले आहेत. त्यावरुन काँग्रेसकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येतंय त्याचा पलटवार करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला टोला लगावला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे आयोजित केलेल्या जनसभेला राजनाथ सिंह संबोधित करत होते.

परदेशात पलायन केलेल्या पी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी ‘मेहुल भाई’ असे संबोधतात ते मात्र सध्या राजनाथ सिंग यांना देशाचे गृहमंत्री असून देखील माहित नसावं असं वाटत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1657)#RajnathSingh(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x