Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम, लग्नसराईच्या हंगामात खरेदीपूर्वी नव्या दरांमधील पडझड पहा

Gold Price Today | जर तुम्ही या लग्नसराईच्या हंगामात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मजबूत अमेरिकन डॉलर आणि यूएस फेडने व्याजदरात केलेली वाढ यामुळे आठवड्याभरात सोन्याच्या दरात तब्बल १.४५ टक्क्यांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचे वायदे 55,416 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. परिणामी, आधीच्या तुलनेत 58,847 प्रति 10 ग्रॅम सोनं आता 3,431 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
सराफा बाजारात भाव काय?
राजधानी दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,840 रुपयांवर पोहोचला आहे. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 55,920 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही 767 रुपयांनी घसरून 64,517 रुपये प्रति किलोवर आला आहे.
सोनं सध्या ऑगस्ट 2020 च्या पातळीच्या खाली पोहोचलं आहे. अडीच वर्षांपूर्वी सोन्याने ५६ हजार २०० रुपयांचा विक्रम केला होता. म्हणजेच यावेळी अडीच वर्षे जुन्या दरापेक्षाही ते स्वस्त आहे. याआधी गुरुवारी सोने 56080 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 65182 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती. शुक्रवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 55,814 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,331 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 42,029 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1.68 टक्क्यांनी घसरून 1,809 डॉलर प्रति औंस झाला आहे. अमेरिकी डॉलरने गेल्या आठवडय़ात ही तेजी कायम ठेवली आणि शुक्रवारी तो १०५.१९५ च्या पातळीवर बंद झाला. वीकेंड सेशनमध्ये ०.६३ टक्क्यांची वाढ झाली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today updates check details on 25 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON