15 December 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, फायदा देणारा स्टॉक खरेदी करावा? अधिक जाणून घ्या

HPCL Share Price

HPCL Share Price | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प या भारतातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प कंपनीने 5827 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या कंपनीला मजबूत तोटा सहन करावा लागला होता. मात्र आता ही कंपनी नफ्यात आली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.47 टक्के वाढीसह 279.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 263.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प स्टॉक 0.17 टक्के घसरणीसह 299.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प कंपनीच्या मार्केटिंग मार्जिनमध्ये वाढ झाल्यामुळे सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये या कंपनीने 5,826.96 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प कंपनीला 2,475.69 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 10.87 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एका महिनाभरापूर्वी 9 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 251.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 9.88 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प स्टॉक 17.69 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 36.45 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HPCL Share Price NSE 09 November 2023.

हॅशटॅग्स

HPCL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x