 
						Adani Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून तेजीमध्ये ट्रेड करणारे ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स घसरले. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के घसरणीसह 1,894.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सलग दोन दिवस अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. केअर रेटिंग एजन्सी फर्मने अदानी एंटरप्रायझेस कंपनीवर नकारात्मकवर भावना व्यक्त केल्या आहेत. कंपनीविरुद्ध सुरू असलेली नियामक आणि कायदेशीर छाननी लक्षात घेऊन रेटिंग एजन्सीने कंपनीची रेटिंग कमी केली आहे.
केअर रेटिंगने काय म्हटले? :
अदानी एंटरप्रायझेसबद्दल केअर रेटिंगने एक अहवाल जाहीर केला आणि म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांविरुद्ध नियामक आणि कायदेशीर छाननी चालू आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या आर्थिक लवचिकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून सध्या तज्ञांनी स्टॉक खरेदी न करण्याची शिफारस केली आहे.
अदानी एंटरप्रायझेस स्टॉक क्रॅश होण्याचे कारण :
केअर रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, सेबी द्वारे चालू असलेल्या छाननीचे निकाल समाधानकारक आले तर अदानी उद्योग समूहाचे मूल्य पुन्हा आधीच्या स्थानावर जाऊ शकते. केअर रेटिंग्सने अदानी स्टॉक बाबत आउटलुक रेटिंग कमी केल्यानंतर, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये 6.6 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. मागील सात दिवसांपासून ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. अदानी उद्योग समूहाने काही कर्जे मुदतपूर्व परतफेड केल्याची माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत :
शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के घसरणीसह 1,894.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील सत्रात अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2,039.65 रुपयांवर बंद झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक एका टप्प्यावर 2,068.85 रुपयांवर पोहचला होता. तथापि, नंतर त्यात सुधारणा झाली आणि शेअर आज 1894.50 रुपयेवर आला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		