1 May 2024 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Patanjali Food Share Price Today | पतंजली फूड्स शेअर 90 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, डिटेल्स जाणून घ्या

Patanjali Food Share Price

Patanjali Food Share Price Today | ‘पतंजली फूड्स’ या बाबा रामदेव यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स पुढील काळात दुप्पट वाढू शकतात असं अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. अनेक तज्ञांनी ‘पतंजली फूड्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 1750 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.011 टक्के वाढीसह 939.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Patanjali Food Limited)

ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने ‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या शेअरवर 1,750 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच पुढील काळात हा स्टॉक 90 टक्के वाढू शकतो. पुढील 12 महिन्यांत शेअरची किंमत 1600 रुपये किंमत पातळीला स्पर्श करू शकते. स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत देत आहे. पतंजली फूड लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 80.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे 2.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड यांनी कंपनीचे 2.63 टक्के आणि 2.16 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि इतरांनी 14.23 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत. पतंजली फूड कंपनीने 27 में 2022 रोजी आपल्या शेअरधारकांना 250 टक्के लाभांश वाटप केला होता. तर 28 मे 2015 रोजी 8 टक्के, जून 2014 मध्ये 8 टक्के, मे 2013 आणि 2012 मध्ये 16-16 टक्के लाभांश वाटप केला होता.

‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या स्टॉकने या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहे. जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 या चार महिन्यांमध्ये पतंजली फूड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचा 22 टक्के नुकसान केला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 35 टक्के नुकसान केले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5.68 टक्के वाढली आहे. ‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1495 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 853.50 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patanjali Food Share Price Today on 29 April 2023.

हॅशटॅग्स

Patanjali Food Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x