29 April 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

भाजपाला लोकसभा निवणुकीत बिहारमध्ये सुपडा साफ होण्याची भीती? तेजस्वी यादवांच्या प्रेग्नेंट पत्नीलाही ED चौकशीत 15 तास बसवून ठेवलं

Lalu Yadav

Bihar Politics ED Action | राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी सांगितले की, सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जमीन फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी त्यांचा मुलगा, मुलगी, मेहुणा आणि इतर निकटवर्तीयांवर कारवाईसाठी सक्ती केली आहे. त्यानंतर लालूंनी संघ आणि भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. लालू यादव यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांसहित ईडीच्या विविध पथकांनी शुक्रवारी देशभरात २४ ठिकाणी छापे टाकले आहेत.

सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण करून परतलेल्या लालूप्रसाद यादव यांनी ईडी प्रकरणी भाजप आणि आरएसएसला आव्हान दिले आहे. लालूंनी आपल्या ट्विटर हँडलवर दोन संदेश टाकले आहेत. या दोन्ही मेसेजमध्ये लालू यादव यांनी एकीकडे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आत्मविश्वास दिला आहे, तर दुसरीकडे मुलगी, सून, नातू, जावई अशा नातेवाईकांवर ज्यांचा या विषयाशी काहीही संबंध त्यांना देखील ईडीने त्रास दिल्याचं म्हटलं आहे. लालूंनी आपल्या ट्विटद्वारे पक्षकार्यकर्ते आणि समर्थकांना एक संदेशही दिला आहे.

आणीबाणीचा काळा आपणही पाहिला आहे, असं लालूप्रसाद यादव यांनी लिहिलं आहे. ती लढाईही आम्ही लढली. आज माझ्या मुली, अल्पवयीन नातवंडे आणि गरोदर सून यांना भाजपच्या ईडीने १५ तास काहीही संबंध नसताना या प्रकरणात बराच वेळ बसवून ठेवले आणि त्यांनाही मानसिक त्रास दिला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढा देईल का? असा प्रश्न लालू यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणूक:
भाजपने स्वतः पक्षांतर्गत केलेल्या सव्हेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होण्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच बिहारमध्ये भाजपाकडे एकही राजकीय चेहरा नसल्याने अनेक अडचणी आहेत. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्वच्छ प्रतिमा मोदींची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यामुळे जितका शक्य होईल तितका त्रास लालू यादव यांच्या कुटुंबियांना द्यायची रणनीती असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lalu Yadav opened attack on ED action BJP and RSS check details on 11 March 2023.

हॅशटॅग्स

#Lalu Yadav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x